पारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह ! --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...
पारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह !
---------
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे आज दि. १४ रोजी तालुक्यातील कोरोना चाचणीचे १५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचे आकडा साडेचारशे च्या जवळ पोचला आहे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पॉझिटिव्ह अहवालामध्ये ढोकी ३, राळेगण-सिद्धी २, गोरेगाव २, डिसकळ २, सारोळा अडवाई १, निघोज १, पारनेर शहर १, कासारे १, बुगेवाडी १, सुपा १ याचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तर तालुक्यातील २४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये भाळवणी ९ राळेगण-सिद्धी ६ गोरेगाव ३ डिसकळ ३ भोयरे गांगर्डा १ कासारे १ या गावांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे.
तसेच ढोकी हे गाव ३ दिवस बंद व राळेगण-सिद्धी ते गाव १४ दिवस बंद करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक यांना तहसीलदार यांनी दिले आहेत.
व ज्या गावातील कोरोना बाधित व्यक्ती अहवालात निष्पन्न झाले आहे. त्या व्यक्ती राहत असलेला १०० मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.