Breaking News

शालिनीताई विखे यांना पुरस्कार !

शालिनीताई विखे यांना पुरस्कार !


राहाता प्रतिनिधी : 
    जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले. ऑनलाईन पध्दतीने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनात या पुरस्काराचे वितरण झाले.महीला बचत गटाच्या चळवळीत योगदान देवून ग्रामीण आणि शहरी भागातील महीलांना उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या कार्याचा गौरव या पुरस्काराने झाला.