Breaking News

डाव उघड झाल्याने योजना बंद पाडली असल्याचा खोटा कांगावा - सौ शोभा दरेकर !

डाव उघड झाल्याने योजना बंद पाडली असल्याचा खोटा कांगावा - सौ शोभा दरेकर !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
जिरायत भागातील शेतक-यांचा पाटपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजुर करून आणली, मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या काळात माजी आमदार काळे यांनी लक्ष दिले नसल्याने ही योजना रखडली होती, परंतु सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाठपुरावा केला, आणि ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले, पाणीही योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम केले होते, ही वस्तुस्थिती असतांना विद्यमान आमदारांनी निसर्गाच्या कृपेने साठलेल्या पाण्याचा (गौर) फायदा घेऊन फक्त बटण दाबण्याचा फोटो काढून उजनी उपसा योजना चालू केल्याचे खोटे भासविल्याचा डाव आखला, परंतू त्यांचा हा खोटा डाव उघड झाल्याने त्यांनी माजी आमदार कोल्हे यांनी योजना बंद पाडल्याचा खोटा कांगावा सुरू असल्याचा आरोप धोंडेवाडी येथील सरपंच सौ शोभा ज्ञानेश्वर दरेकर यांनी केला आहे.
जिरायत भागातील जवळके, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, वेस, बहादरपूर,सोयगाव इतर गावांचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजुर करून आणली. परंतु मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या काळात मतदार संघाला लाभलेल्या निष्क्रीय आमदारांच्या काळात या योजनेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले, त्यामुळे या भागातील शेतक-यांच्या आनंदावर विरजण पडले होते, परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात माजी आमदार सौ कोल्हे यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून या योजनेचे पाणी तलावापर्यंत पोहचवले.
सध्या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने नौसर्गिक रित्या भरलेल्या साठवण तलावामुळे या साठलेल्या पाण्यावर राजकीय पोळी भाजण्याचे काम विद्यमान आमदार करत आहे, पंरतु या परिसरातील जनता सुज्ञ असुन त्यांना सर्व वस्तुस्थिती ज्ञात आहे, त्यामुळे कायमच दिशाभुल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, तसाच प्रकार  उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित केल्याचे खोटे भासविण्याचा डाव रचला, परंतु त्यांचा हा डाव खोटा असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कोल्हे यांनी योजना बंद पाडण्याचा कांगावा सुरू केला असल्याचेही सौ दरेकर म्हणाल्या.