Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज १८ रुग्ण वाढ तर ५ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात आज १८ रुग्ण वाढ तर ५ कोरोनामुक्त
करंजी प्रतिनिधी- 
      आज कोपरगाव कोविड सेंटर येथे एकूण ५९ संशयितांची रॅपिड किट द्वारे तपासणी केली असता त्यात १८ रुग्ण कोरोना बाधित तर ४१ निगेटीव्ह आले असून ८ अहवाल पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठवले आहे तर आज कोरोनावर मात करत ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
    यात करंजी-१, कोळपेवाडी-१, राजपाल सोसायटी-३, संजयनगर-५,  टाकळी नाका-३, शिवाजी रोड-१, श्रद्धा नगरी-२, यशवंत चौक-१, गांधीनगर-१ असे १८ रुग्ण आढळून आले आहे.
    तर आज अखेर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ५५० झाली आहे तर ऍक्टिव्ह  रुग्णाची संख्या १७२ झाली आहे.