Breaking News

पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात चार शेळ्या मृत्युमुखी, परिसरात वाघाचा वावर !

पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात चार शेळ्या मृत्युमुखी, परिसरात  वाघाचा वावर !
पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे चार शेळ्या वाघाने हल्ला केल्याने मृत पावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. दि. २ रोजी वारणवाडी गावातील शेतकरी पिराजी भिका कराळे वय ६० हे आपल्या १२ शेळ्या घेऊन चारण्यासाठी परिसरातील लांबदरा या ठिकाणी गेले होते मात्र संध्याकाळी शेळ्या घरी घेऊन येत असताना ४ शेळ्या गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले मात्र शोधाशोध केली असता या शेळ्यांचा तपास लागला नाही 
       ज्या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी नेल्या तिथे रात्री शोधाशोध केली त्या परिसरामध्ये चार शेळ्या मृतावस्थेत पडलेल्या होत्या या शेळ्या वाघाने हल्ला केल्याने मृत पावल्या आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेळ्यांच्या गळ्याचा चावा घेतल्याने त्या मृत पावल्याचे दिसून येत आहे या परिसरात वाघाचा वावर असल्याचे येथील रहिवाशी सांगत आहेत. या शेतकऱ्याचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेळ्यांचा पंचनामा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपसरपंच अंकुश भाऊ काशीद ,भाऊसाहेब महादू काशीद, पांडुरंग एकनाथ कोकाटे, नानाभाऊ भाऊसाहेब काशीद आदींनी केली आहे.