Breaking News

आंदोलकांविरूध्द गुन्हे दाखल !

आंदोलकांविरूध्द गुन्हे दाखल !

राज सोमवंशी/शिर्डी प्रतिनिधी : 
महाराष्ट्रातील शिर्डीसह सर्व धार्मिक स्थळे खुले करण्यात यावी यासाठी आज शिर्डीमध्ये आंदोलन झाले त्या आंदोलनकर्त्यां वर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 553/20 भादावी कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . 144कलम जिल्ह्यामध्ये जारी असताना बेकायदेशीर जमाव जमवुन घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली आहे,
शिर्डीतील घंटानाद आंदोलनात सहभागी झालेल्या आयोजक राजेंद्र
भाऊसाहेब गोंदकर सचिन भागवतराव तांबे रवींद्र पांडुरंग गोंदकर
सुजित ज्ञानदेव गोंदकर व बाळासाहेब वाघ यांच्यावर 144 कलम
उल्लंघन केल्यामुळे 188  कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला, यासंदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोरोनामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे गेल्या साडे पाच महिन्यापासून बंद आहेत.त्यामुळे धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरां मधील गावांमधील आर्थिक व्यवहार पूर्ण आजपर्यंत ठप्प आहे.महाराष्ट्रा बाहेरील इतर काही राज्यात धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे अजूनही बंद आहेत. तेव्हा ही धार्मिक स्थळे सुरू करावीत.यासाठी अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी व राज्यांमध्ये घंटानाद आंदोलन तसेच दार उघड उद्धवा दार उघड असे आंदोलन शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजे नंतर शिर्डी त करण्यात आले.शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडावे म्हणून शिर्डी मध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे
कोरोणामुळे सध्या बंद आहेत. गेली साडे पाच महिन्यापासून सर्व
धार्मिक स्थळे बंद आहेत, शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर गेल्या 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डीचे श्री साईबाबा मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे खुले करण्यात यावीत.अशी मागणी अध्यात्मीक समन्वय आघाडी यांनी यावेळी केली.