Breaking News

पारनेर तालुक्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह २१ निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह २१ निगेटिव्ह


पारनेर प्रतिनिधी-
      पारनेर तालुक्यातील दि २९ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार ४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून २१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
या पॉझिटिव अहवालामध्ये पारनेर २ राळेगण सिद्धी १ गुणोरे १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तर निगेटिव्ह अहवालांमध्ये निघोज ५ पारनेर ५ कान्हूर पठार ५ जवळा २ वडगाव आमली १ कळस १ गांजीभोयरे १ या गावातील व्यक्तींचा निगिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यातील ज्या गावात ज्या भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण अहवालत प्राप्त झाले आहे ते राहात असलेल्या शंभर मीटर च्या परिसरात १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.