Breaking News

नेवासा तालुक्यात २६ रुग्णांची वाढ, तीन पञकारांना कोरोनाची लागण !

नेवासा तालुक्यात २६ रुग्णांची वाढ, तीन पञकारांना कोरोनाची लागण !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराच भूत तालूक्याच्या मानगुटीवर पक्क बसल्याचे आरोग्य विभागाने रविवार (दि. ९) रोजी दिलेल्या अहवालातून समोर आलेले आहे. दिवसभरात २६ रुग्णांना कोरोना बाधीत आजाराने पच्छाडलेले असून एका जणाने कोरोनावर मात केल्याचे रविवारच्या अहवालातून समोर आले आहे.
       तालूक्यातील नेवासा खुर्द ०९, सोनई ०५,उस्थळ दुमाला ०५, घोडेगांव ०३, सलाबतपूर ०१, खेडले काजळी ०२ तर नेवासा बुद्रूक ०१ अशा एकूण २६ रुग्णांची तालूक्यात वाढ झाली असून त्यामध्ये काल एक तर आज दोन पञकारांचाही समावेश झाला असल्याची माहीती हाती आली आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढत चालला असून आरोग्य विभाग कोरोनावर मात करण्यासाठी सतर्क झालेला असतांना पोलिस यंत्रणा सार्वजनिक गर्दी हटविण्यात अपयशी ठरल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मत सुज्ञ नागरीकांतून व्यक्त होतांना दिसून येत आहे.