Breaking News

साई निर्माण चा सामाजिक पाठपुरावा !

 
साई निर्माण चा सामाजिक पाठपुरावा !


  शिर्डी/प्रतिनिधी :
साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन श्री विजयराव कोते पाटील यांनी नांदुर्खी रोड वरील प्रसादनगर येथे भेट देऊन तेथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करत या भागातील अडीअडचणी, समस्या जाणून घेत या समस्या कशा लवकरात लवकर सोडवता येतील या विषयी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली.
   यात प्रामुख्याने प्रसादनगर मधील अंतर्गत रस्ते एकत्र करणे जेणे करून ॲबूलन्स, कचरा गाडी, अग्निशमन गाडी प्रत्येक घरा पर्यंत पोहचेल, अडचण करणारे लाईटचे पोल काढून टाकून भूमिगत कनेक्शन करणे, काही ठिकाणी मुरूम टाकणे, महावितरणच्या अधिकारी यांना भेटून येथील पोल व कनेक्शन बद्दल चर्चा करून निर्णय घेणे, रोड वरून असणारे वाद मिटवून काम सुरू करणे, काही नागरिकांचे संस्थान संदर्भातील व इतर ही काही वैयक्तिक कामांसाठी पाठपुरावा करणे याबाबत विचारविनिमय करण्यात आले..
या प्रसंगी प्रसादनगर येथील श्री भानुदास मामा गोंदकर पा, श्री राजेंद्र लोढा, श्री अरूण चांदोरे, श्री बाबुराव पगार, श्री सय्यदभाई, श्री चंद्रभान चौधरी, श्री राजेंद्र जाधव,श्री शिलेदार, श्री देवकर, श्री प्रशांत सुर्यवंशी, श्री साळवे, श्री मंगेश निकम, श्री प्रशांत गोंदकर, श्री भरत चांदोरे, श्री सोमनाथ कुटे, सचिन पगार, ऋषी माळी, श्री दादवाणी, श्री शिरसाठ, राहूल मगर, श्री सचिन वाणी हे सर्व रहिवाशी उपस्थित होते.