Breaking News

नेवासा तालूुक्यात दिवसभरात ८ रुग्णांची वाढ !

नेवासा तालूुक्यात दिवसभरात ८ रुग्णांची वाढ !
  
नेवासा  तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यात रविवार (दि.०२) रोजी दिवसभरात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.रविवारी सायंकाळी तालूका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित २४८ पैकी ११५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालूक्यातील १२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
 रविवारी प्राप्त झालेल्या आहवालात एकाचाही मृत्यु झालेला नसल्याचे तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.
  कोरोनाबाधित झालेल्या रुग्ण  नेवासा०३,नेवासा फाटा ०१ , जैनपुर ०३,तरवडी ०१ येथिल
 असून नेवासा तालूक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरी रहा,सुरक्षित रहा असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.