Breaking News

तालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला पुरुषाचा मृतदेह;पोलीस घटनास्थळी दाखलतालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला पुरुषाचा मृतदेह;पोलीस घटनास्थळी दाखल
पाथर्डी/प्रतिनिधी :
      तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचे (वय अंदाजे ४०) मयत अवस्थेत आज (गुरुवारी) सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.अद्याप पर्यत ओळख पटली नाही.घटनेची माहिती कळताच त्या बिटचे हवालदार रांजणे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांनी धाव घेतली असुन ओळख पटवण्याचे काम चालु आहे.
        
      सदरील मयत मृतदेहाच्या ठिकाणी विषारी बॉटल आणि एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स एम एच १५ पासिंगची मोटरसायकल आढळून आली आहे.