Breaking News

पारनेर येथील बँक ऑफ बडोदा च्या कारभारामुळे ग्राहक हैराण !

पारनेर येथील बँक ऑफ बडोदा च्या कारभारामुळे ग्राहक हैराण


 पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर येथे बँक ऑफ बडोदा या बँकेची शाखा आहे या बँकेमध्ये तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील खातेदारांची खाते या बँकेत आहेत बँकेच्या शाखा अधिकारी व कर्मचारी हेकेखोर व मनमानी मुळे ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे अनेक वेळा हेलपाटे मारूनही ग्राहकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.
तसेच अनेक वेळा कनेक्टिविटीची अडचण सांगितली जाते त्यामुळे अनेक खातेदारांचे व्यवहार ठप्प होत आहेत खातेदारांनी विचारणार केल्यानंतर बँक कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत या सर्व बँकेच्या गलथान कारभाराचा मनस्ताप ग्राहकांना नाहक सहन करावा लागत आहे.
     पारनेर शहरामध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेची शाखा सुपा पारनेर रोड लगत असलेल्या इमारतीत आहे गेल्या काही वर्षापूर्वी ही शाखा पारनेर येथे सुरू झाली त्यावेळी अनेक ग्राहकांनी खाती या बँकेमध्ये खाते खोलले सुरुवातीच्या काळामध्ये बँकेचे कामकाज व्यवस्थित सुरू होते परंतु अलीकडे या बँकेतील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून ग्राहकांना वारंवार अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच ग्राहकांना बँकेमध्ये सुविधा पुरवल्या जात नाही बँकेमध्ये गेलेल्या ग्राहकांना अधिकारी उद्धटपणे बोलतात तसेच ग्राहकांना हीन वागणूक दिली जाते बँकेचा लंचटाईम आहे वेळ संपली आहे अशी कारणे दिली जातात बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना सर्व सुविधा व्यवस्थित पुरवाव्यात व अधिकाऱ्यांचा हेकेखोर पणा बंद करून ग्राहकांना सेवा देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.