Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४७० नवे रुग्ण आज २१५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज !


 

*दिनांक: ०५ ऑगस्ट, रात्री ७-३० वाजता*
 

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४७० नवे रुग्ण आज २१५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
अहमदनगर :
जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७०  ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, अँटीजेन चाचणीत  २२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६१० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली. 

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६ रुग्ण बाधित आढळून आले  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीरामपुर ०२, मनपा ०४,
कॅन्टोन्मेंट  ०३, राहुरी०२, नगर ग्रामीण ०२,
कर्जत ०१, श्रीगोंदा ०१, नेवासा येथील ०१ अशा रुग्णांचा समावेश होता.त्यानंतर, पुन्हा आणखी १४ जण बाधीत आढळून आले. यामध्ये, मनपा ०६ - पाईप लाईन रोड ०१ गौरी घुमट ०१, सारस नगर ०१, अहमदनगर ०१, दिल्ली गेट ०१, सावेडी ०१. नगर ग्रामीण ०१ - सारोळा कासार,  कॅन्टोन्मेंट ०१, शेवगाव ०१- शहर टाकळी, कर्जत ०२- राशीन ०२,  संगमनेर ०१- निमोण, 
श्रीरामपूर ०२.

अँटीजेन चाचणीत आज २२६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १७, संगमनेर १२,  राहाता १२, पाथर्डी २५, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर १८, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा १८, श्रीगोंदा १२, पारनेर १४, राहुरी ०१, शेवगाव २५,  कोपरगाव ३०, जामखेड ०३ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १७१, संगमनेर १७, राहाता ०६, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ०३,  श्रीरामपुर ०१, नेवासा ०४, श्रीगोंदा ०३, पारनेर ०१, अकोले ०३ आणि कर्जत येथील ०२ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण २१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १२३, संगमनेर २२, राहाता १०, पाथर्डी ४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ११, राहुरी १, शेवगाव १,
कोपरगाव १, कर्जत ३.

बरे झालेले एकूण रुग्ण:४५८०

उपचार सुरू असलेले रूग्ण:२६१०

मृत्यू: ८८

एकूण रूग्ण संख्या:७२७८