Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू, कोरोना रुग्णांच्या उच्चांकसह कोरोनाचा तिसरा बळी !

श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू ! कोरोना रुग्णांच्या उच्चांकसह कोरोनाचा तिसरा बळी 
कोळगाव/प्रतिनिधी 
       श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाणे मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती. तालुक्यात एकूण ३ कोरोणा रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून तालुक्यात आज पर्यंत २६७ रुग्ण कोरोना बाधित झाले असून त्या पैकी ३ जणांचा मृत्यू होऊन एकट्या श्रीगोंदा शहरात ६० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडून नागरिकांच्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याने उद्या पासून ३ दिवस श्रीगोंदा शहरातील अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्व बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.