Breaking News

कोपरगाव तालुक्यातील माजी सरपंचाचे कोरोना ने निधन !

कोपरगाव तालुक्यातील माजी सरपंचाचे कोरोना ने निधन


करंजी प्रतिनिधी-  
   कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील माजी सरपंच  केशवराव होन यांचे कोरोनाने निधन झाले असून ते ७३ वर्षाचे होते.
   त्यांना मागील ८ दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवल्याने अस्वस्थ वाटत असल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल  करत कोरोना तपासणी केली असता त्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच त्यांचा काल अहमदनगर येथे हॉस्पिटलमध्ये  मृत्यू झाला.त्यांचें अंत्यसंस्कार देखील नगर येथेच करण्यात आले.
   होन यांनी सरपंच, उपसरपंच, दूध विकास संस्थेचं, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आधी पदे भूषविले होते त्यांचा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.