Breaking News

जामखेड येथील तरुणाचा सौताडा येथील तलावात बुडून मृत्यू !

जामखेड येथील तरुणाचा सौताडा येथील तलावात बुडून मृत्यू !


जामखेड प्रतिनिधी :
सौताडा ( ता पाटोदा) येथील रामेश्वर धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या साठवण तलावाच्या भिंती खालील हौदामध्ये जामखेड येथील सदाफुले वस्ती वरील एका युवकाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाटोदा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत. 
 विनोद चंद्रकांत आसंगे असे मृत यूवकाचे नाव असल्याचे समजते. बीड जिल्हयात सध्या लाँकडाऊन आहे तरी नागरिक आडमार्गाने सौताडा येथे जात असल्याचे दिसत आहे.