Breaking News

भाजप खासदार आणि मुलाला कोरोनाची लागण !

 Most Of The Newcomers In The Bjp's Gangapar And Yamunapar ...

नांदेड : महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना गुरुवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविडची लक्षणं असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. रात्री त्यांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

 

काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. सध्या पिता-पुत्रांवर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रताप चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली असून खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

यापूर्वी राज्याचे मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. अशोक चव्हाण हे नांदेडमधून मुंबईला उपचारासाठी दाखल झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. मराठवाड्यात कॉंग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे,आमदार अमर राजूरकर, आमदार माधव पाटील जवळगावकर या लोकप्रतिनिधींनाही कोरोना झाला होता.