Breaking News

यवतमाळ जिल्ह्यातील अंधारवाडी शिवारात वाघाची दहशत !

 

यवतमाळ | जिल्ह्यातील पाटणबोरी लगतच्या अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी हा वाघ अंधारवाडी शेतशिवारात एका शेतात आरामात फेरफटका मारत असल्याचं शेतकरी आणि शेतसमजुरांच्या निर्देशनात आलं होतं. यावेळी वाघाने 3 शेळ्यांना देखील ठार केल होतं. आजही याच भागात या वाघाने एका गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या खरीपाचा हंगाम सुरु असल्याने शेतात निंदण, डवरणी आणि फवारणीचे काम सुरु असल्याने वाघाच्या धास्तीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे. गावात वाघाची प्रचंड दहशत असल्यानं सध्या गावकरी लाठ्या काठ्या घेऊन या वाघाचा शोध घेत आहे. दरम्यान हा वाघ गावकऱ्यांच्या हातात सापडल्यास तसेच वाघाच्या हल्ल्यात कुणाचे बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे.