Breaking News

श्रीगोंदा शहर तीन दिवसासाठी लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद व्यापारी व प्रशासनाचा निर्णय !

श्रीगोंदा शहर तीन दिवसासाठी लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद व्यापारी व प्रशासनाचा निर्णय !           
श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी- 
   श्रीगोंदा शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ५० झाली आहे. त्यामुळे श्रीगोंदा शहर हॉटस्पॉट होऊ लागले आहे.  यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो थांबविण्याची गरज आहे. यासाठी श्रीगोंदा व्यापारी असोसिएशन, जेष्ठ नागरिक व श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी एकमताने शहर बंदचा निर्णय घेतला असून या निर्णयास प्रशासनाने संमती दर्शविली आहे. म्हणून उद्या मंगळवार दि. ४ ऑगस्ट , बुधवार ५ ऑगस्ट व गुरुवार ६ ऑगस्ट  रोजी श्रीगोंदा शहरात मेडीकल, दुध व दवाखाने सुविधा वगळता पुर्णपणे बंद राहील. अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिली तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास व या निर्णयास सहकार्य करुन स्वयंशिस्त पाळावी. घरी रहा, सुरक्षित रहा व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.