Breaking News

जिवाची परवा न करता राजेश्वरी कोठावळे कोरोना रुग्णाना देत आहे योगाचे धडे !

जिवाची परवा न करता राजेश्वरी कोठावळे कोरोना रुग्णाना देत आहे योगाचे धडे !
------------------------
योगामुळे कोरोना रुग्णांचे मानसिक संतुलन बदलते; यासाठी पारनेर तालुक्यात योगा प्रशिक्षण उपक्रमाला उत्तम प्रतिसाद.
शशिकांत भालेकर/पारनेर -
          कोरोना मुळे संपूर्ण जग हैराण व परेशान झालेली आहे. जागतिक संकट सध्या घोंगावत आहे प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे तसेच कोरोना पासून आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे व त्यासाठी अनेक जण घरात स्वतःला लॉकडाऊन करून घेतात मात्र अनेकजण संकट काळामध्ये घराबाहेर पडून लोकांच्या सेवेसाठी धडपड करत असतात.  समाजासाठी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे ठरत आहेत असेच पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी योगा प्रशिक्षण देण्याचे काम तालुक्यातील योगा प्रशिक्षक व कराटे चॅम्पियन राजराजेश्वरी कोठावळे या करत आहेत.
कोरोना महामारी मुळे संपूर्ण मानवजातीवर मोठे संकट सध्या आलेले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शास्त्रज्ञांकडून अथक  प्रयत्न चालू आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही. असे असताना खबरदारीच या रोगावर रामबाण उपाय आहे व त्या पद्धतीने प्रत्येक जण समाजामध्ये वावरत असताना काळजी घेत आहे मात्र असे असूनही सामाजिक बांधिलकी समाजाप्रती असणारी अस्मिता याचा प्रत्यय कोरोना संकटात देखील येत आहे. कोरोना रुग्णांसाठी पारनेर येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले  हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
 मात्र रुग्ण येथे ठेवून त्यांना वैद्यकीय उपचारांबरोबरच राजयोग मेडिटेशन व म्युझिकल योगा येथे घेतला. जातो मात्र योगा घेण्यासाठी येथे प्रशिक्षक म्हणून राजराजेश्वरी कोठावळे ह्या येथे रुग्णांना प्रशिक्षण देत असतात खरंतर कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात जाणे हे धाडसाचे  व जोखमीचे काम आहे मात्र राजेश्वरी कोठावळे या पी पी इ किट घालून दररोज योगा घेत. असतात मालेगाव पॅटर्नप्रमाणे डॉक्टर उज्ज्वल कापडणीस यांचा म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची भीती यातून जाते रुग्ण येथे आल्या नंतर त्यांना कोरोना झाल्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो व त्या धक्क्यातून रुग्णांना सावरण्यासाठी या योगा व मेडिटेशनचा उपयोग होतो यामुळे मनातील भीतीच्या विचारांचे परिवर्तन होऊन ते येथे आनंदी राहतात रुग्णांचा आत्मविश्वास यातून वाढला जातो त्यांचे मनोबल येथे उंचावले जाते योगा प्रशिक्षक राजेश्वरी कोठावळे यांचे हे कोरोना बाधित रुग्ण दररोज योगा करण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात सध्या पावसाचे वातावरण असल्याने योगा करण्यास किंवा रुग्णांना बाहेर वरांड्यात एकत्र येण्यास अडचणी येतात त्यामुळे पावसाचे वातावरण संपेपर्यंत या रुग्णांना योगासाठी अतुर होताना प्रशिक्षक कोठावळे यांनी पाहिले आहे.
        रुग्ण केअर सेंटर मध्ये आल्यानंतर त्याचे मनोबल खच्चीकरण झालेले असते मात्र योगामुळे दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मनोबला मध्ये सुधारणा होऊन ते आनंदी उत्साही व निरोगी असल्यासारखे वावरत असतात त्यामुळे कोरोना हा आजार बरा होण्यास मदत होते. राजेश्वरी कोठावळे यांच्या या सामाजिक योगदानाबाबत आमदार निलेश लंके यांनी त्यांचे कौतुक केले तसेच राजश्री कोठावळे यांच्या निर्भीड निडरपणा बाबत तालुक्याला अभिमान आहे असे आमदार लंके यांनी सांगितले आहे कोरोनात करत असलेल्या योगदानाबाबत तालुक्यातील सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

    कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे  फोन  येत असतात व ते सांगत असतात की आमचे पेशंट कडे लक्ष द्या ते खूप डिप्रेशनमध्ये आहेत त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना योगामध्ये सहभागी करून घेतल्यानंतर एक दोन दिवसातच ते त्यातून बाहेर येतात व आनंदी राहतात कोरोना काळामध्ये रुग्णांची सेवा करण्याचे काम मिळाले यामुळे समाधान वाटते जरी हे काम करत असताना जीव धोक्यात असला तरी या रुग्णांना बरे होताना पाहिल्यानंतर व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहताना  रुग्णांची सेवा करावी यासाठी उत्साह मिळतो
-----------
राजराजेश्वरी कोठावळे
योगा प्रशिक्षक पारनेर
-------------------------------------------------------
 कोरोना रुग्णांना फक्त औषधोपचाराची गरज नाही तर त्यांना मानसिक आधारही गरजेचा आहे तो मिळण्यासाठी म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन याचा उपयुक्त फायदा रुग्णांना मिळत आहे योगाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राजेश्वरी कोठावळे यांनी अतिशय उत्तम रित्या निभावली आहे 
राजश्री कोठावळे यांसारख्या तरुणी मुळे प्रशासनालाही कोरोना शी लढताना उत्तम सहकार्य मिळत आहे
-------------
ज्योती देवरे 
तहसिलदार पारनेर