Breaking News

पिंपरी जलसेन येथील मेजर भरत कदम शहीद !

पिंपरी जलसेन येथील मेजर भरत कदम शहीद !
पारनेर प्रतिनिधी -
         पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे जवान भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहे त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील एक भाऊ असा परिवार आहे.
       भरत कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी दैनंदिन मॉर्निंग बिपिटी करत असताना अचानक भरत यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये व नंतर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली अशी प्राथमिक माहिती परिवाराकडून समजते त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी ११ : ३० वाजता पिंपरी जलसेन येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहे.
      जवान भरत कदम हे आपल्या मुलीच्या दि २७ रोजी असणाऱ्या पहिल्या वाढदिवसासाठी गावी येणार होते त्यांनी रजा काढली होती ती मंजूरही झाली होती गावी निघण्याच्या एक दिवस आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला त्यांचे पार्थिव रविवारी अकरा वाजता पिंपरी जलसेन येणार आहे तेथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
   जवान भरत कदम यांच्या जाण्याने पिंपरी जलसेन परिसर व पारनेर तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.