Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३ घरकुले मंजूर - सभापती गणेश शेळके !

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३ घरकुले मंजूर - सभापती गणेश शेळके !
पारनेर प्रतिनिधी - 
         पारनेर तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये एकूण २२० घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती सभापती  गणेश शेळके यांनी दिली एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोनशे घरकुले अल्पसंख्यांकांसाठी एक एसटीसाठी १६ एस सी साठी ४ असे एकूण २२१ घरकुले मंजूर झाल्याचे सांगितले पैकी आज आज ५३ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे हे प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये चे अनुदान त्यांच्या खात्यावर ज्या पद्धतीने बांधकाम होईल त्या पद्धतीने जमा करण्यात येणार आहे एकूण ६३ लाख ६० हजार रुपये लाभ घरकुल लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले लवकरात लवकर पुढील काळामध्ये जास्तीत जास्त गोरगरीब जनतेसाठी घरकुले त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस असल्याचे गणेश शेळके यांनी सांगितले या योजनेमध्ये ते प्रत्यक्षात लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जाणार असल्याचेही या वेळेस त्यांनी सांगितले चांगल्या पद्धतीने बांधकाम करून कायमस्वरूपी चे घर गोरगरीब जनतेला देऊन त्यासाठी त्यांना उत्तम निवारा होणार असल्याचेही सांगितले यापुढच्या काळामध्ये ही  जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा मानस आहे असून तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना आहेत त्या समाजातील गरीब घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भविष्यात केले जाईल कोरोना या संकट काळामध्ये अनेक गरीब गरजू लोकांना आधार देण्याचे काम सभापती गणेश शेळके यांनी केले आहे यापुढेही अशाच प्रकारचे काम आपण करत राहणार आहे तसेच तालुक्यात कोरोना चा संसर्ग  वाढत आहे त्यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सभापती गणेश शेळके यांनी केले आहे.