Breaking News

मोबाईल नेटवर्क सुरळीत करावे मनसेचे कोपरगाव मध्ये निवेदन !

मोबाईल नेटवर्क सुरळीत करावे  मनसेचे कोपरगाव मध्ये निवेदन 
करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव शहरात अनेक दिवसापासून मोबाइल नेटवर्क सुरळीत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष  सतिश  काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  नायब तहसिलदार योगेश कोतवाल यांना निवेदन दिले. 

      या नि निवेदनाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली की सध्या लॉकडाउन मुळे शाळा- कॉलेज  बंद असल्यामुळे सर्व  प्रवेश ऑनलाईन पद्धतीने  घ्यावे लागत आहेत.  परंतु अनेक दिवसापासून मोबाईल नेटवर्क सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होवू शकते.

       त्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचे देखील ऑनलाईन अभ्यास चालू असून त्यांना त्यांचे पालकांना देखील या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कोरोना काळामध्ये कोणीही व्यापार- व्यवसायासाठी प्रवास करू शकत नसल्याने  सर्व व्यापार हा फक्त मोबाईलद्वारे चालू आहे, परंतु व्यापारी बांधवांना देखील याचा फटका बसत असून या नेटवर्कमुळे आवाज देखील येत-जात नसून फोन लागत नाही-लागला तर आवाज येत नाही. असे एक ना अनेक अडचणी या नेटवर्कमुळे होत असून एकही या गोष्टीचा गांभिर्याने विचार करत नसून आपल्या मोबाईल कंपन्या महिन्याचे पॅकेज बरोबर घेत असून सुविधा मात्र खराब देत आहे. तसेच याचा परिणाम विद्यार्थी व्यापारी जनतेवर होत असून आजारी असणाऱ्या पेशंट व कोरोनाग्रस्त व कोरांटाईन झालेल्या परिवारांना प्रामुख्याने होत आहे. 

तरी सर्व मोबाईल टॉवर्स कंपनीला मनसेने इशारा दिला असून आपण आपल्या मोबाईल नेटवर्कमध्ये १५  दिवसात सुधारणा करुन जनतेला  होणाऱ्या त्रासापासून  मुक्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगांव शहर व तालुका आपल्या मनसे स्टाईलने आंदोलन करत सर्व कंपन्यांमध्ये सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पासून काही कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न उभा राहिला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी  मोबाईल कंपनी टॉवर्सवॉल्यांची राहील. 

 या निवेदनावर  मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे , मा. तालुकाध्यक्ष अलिम शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर ,रघुनाथ मोहिते , संजय चव्हाण , संजय जाधव,  बंटी सपकाळ, नितिन त्रिभुवन, जावेद शेख,  सचिन खैरे, सागर महापुरे, आनंद परदेशी,  जाधव, बापू काकडे, नवनाथ मोहिते, यांच्या सह्या आहेत