Breaking News

साई सेवा भक्त मंडळाने दिले कोरोना बाधीत नागरिकांना पिण्यासाठी गरम पाणी देणारे मशीन !

साई सेवा भक्त मंडळाने दिले कोरोना बाधीत नागरिकांना पिण्यासाठी गरम पाणी देणारे मशीन !
  ( गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर स्तुत्य उपक्रम ) 


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव शहरातील  कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधीत नागरिकांना पिण्यासाठी गरम पाणी मिळावे म्हणून गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर साई सेवा भक्त मंडळाने आपल्या सदस्यांच्या सहाय्याने गरम पाणी देणारे मशीन  दिले आहे.
  यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  ग्रामीण रूग्णालयाचे  वैद्यकीय अधिक्षक डॉ . कृष्णा फुलसौंदर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . संतोष विधाते यांच्याकडे हे मशिन साई सेवा भक्त मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ,माजी नगरसेवक संजय जगताप यांनी सुपूर्त केले. कोरोना महामारीच्या आजाराने जगभर थैमान घातले आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.याचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रशासन आतोनात प्रयत्न करीत आहे.कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्णांवर  चांगल्या प्रकारे उपचार केले जात आहे त्यांना वेळोवेळी औषध सामग्री दिली जात आहे वैद्यकीय तज्ञांनी वेळोवेळी कोमट गरम पाणी घेण्याचा रुग्णांना सल्ला दिला जातोय मात्र कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोमट गरम पाणी पिण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रुग्णांना कोमट गरम पाणी उपलब्ध होत नसे हि बाबा साई सेवा भक्त मंडळाने जाणली अन  गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधीत नागरिकांना पिण्यासाठी गरम पाणी देणारे मशीन दिले आहे.मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.