Breaking News

चोरट्यांनी घरफोडी करत सोने केले लंपास !

चोरट्यांनी घरफोडी करत सोने केले लंपास !
कोल्हार  :-
    अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून व घरातील महिलेस मारहाण करीत घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना कोल्हार येथे कोल्हार -राजुरी रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर मध्ये मंगळवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर असे की कोल्हार -राजुरी रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर मध्ये राहणारे व्यवसायिक जमीर इस्माईल शेख राहतात मंगळवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडला व घरात प्रवेश केला व घरातील कपाटाची उचकापाचक केली.
कपाटात काहीच न मिळाल्याने चोरट्यांनी किचन रूम मधील डब्याची उचका पाचक केली व डब्यात ठेवलेले शकीला शेख यांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यांनी चोरून नेले.
चोरी करत असताना जमीर यांची आई रशिदा शेख यांना आवाजामुळे जाग आली परंतु चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना दुसर्‍या खोलीत ओढत नेऊन मारहाण केली झाला प्रकार त्यांनी मुलगा व सून बाईस सांगितला.
जमीर शेख यांनी पोलिसांना फोन केला घटनास्थळी लोणी पोलिस स्टेशनचे एपीआय प्रकाश पाटील, कोल्हार औट पोस्टचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे ,राजेंद्र औटी ,तसेच कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्ट चे उपाअध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब रघुनाथ खर्डे ,स्वप्नील निबे ,जावेद शेख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक व ढसे तज्ञ पाचारण करण्यात आले होते.