Breaking News

आज दिवसभरात पारनेर तालुक्यात २४ कोरोना पॉजिटीव्ह !

आज दिवसभरात पारनेर तालुक्यात २४ कोरोना पॉजिटीव्ह !
--------
तालुक्यातील कोरोना ची संख्या साडेतीनशे च्या पार
पारनेर/प्रतिनिधी : 
     पारनेर तालुक्यातील कोरोना ची संख्या साडेतीनशे च्या पार झाली आहे. आज दिवसभरात प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
      यात वाडेगव्हाण ३, जमगाव २, जवळा ३ लोणीमावळा १, वडझिरे १, पारनेर १, पिंपळगाव रोठा २, निघोज २, करुंद २ ,  गोरेगाव १, भाळवणी २, मावळेवाडी १, सुपा १, नारायणगव्हाण १, पाबळ १, असे २४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
      ज्या गावात कोरोना बाधित सापडले आहे. तेथील १०० मीटर चा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.