Breaking News

तालुक्यात आज दुपारपर्यंत तीन कोरोना बाधित, पारनेर शहरातील मटन दुकानदाराला कोरोना ची लागण !

पारनेर तालुक्यात आज दुपारपर्यंत तीन कोरोना बाधित
----------
पारनेर शहरातील मटन दुकानदाराला कोरोना ची लागण
पारनेर प्रतिनिधी- 
      पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या अहवाला नुसार तीन जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये पारनेर शहरातील एक ३० वर्षीय तरुण मावळेवाडी येथील ३३ वर्षीय तरुण व पाबळ येथील ३० वर्षीय तरुण यांचा पॉजिटीव्ह अहवालात समावेश आहे.
   पारनेर शहरातील मटन दुकानदार बाधित सापडल्यानंतर दुकान व परिसर बंद केला आहे तसेच त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्यअधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी दिली आहे.
  ज्या परिसरामध्ये कोरोना बाधित व्यक्ती सापडली आहे तेथील १०० मीटर भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.