Breaking News

भानुदास साळवे पारनेर पोलीस स्टेशन समोर सुरू केले उपोषण तात्पुरते मागे !

भानुदास साळवे पारनेर पोलीस स्टेशन समोर सुरू केले उपोषण तात्पुरते मागे
----------
पठारवाडी येथील खडी क्रेशर सील तोडून पुन्हा सुरू केल्यामुळे  सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे यांचे उपोषण !
---------


पारनेर प्रतिनिधी -
       पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील अनधिकृत खडी क्रेशर सील तोडून ते पुन्हा सुरू केले आहे. त्या मालकावर याबाबत पुन्हा गुन्हा दाखल व्हावा या व अन्य मागण्यांसाठी पारनेर पोलीस स्टेशन समोर सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी उपोषण सुरू केले होते.  मात्र या बाबत तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांच्यात झालेल्या चर्चेत तसेच सध्या कोरोना मुळे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सध्या पोलीस प्रशासनावर अनंत चतुर्थी मुळे  अतिरिक्त ताण असल्याने याचा सर्व विचार करून उपोषण मागे घेतले आहे. असे भानुदास साळवे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे दि. 31 रोजी सकाळी पारनेर पोलिस स्टेशन समोर पठारवाडी येथील अनधिकृत खडी क्रेशर सील तोडून ते पुन्हा सुरू केले आहे त्या मालकावर याबाबत गुन्हा दाखल व्हावा सील केलेल्या कालावधीत सुमारे 20 लाख रुपयांचे वीज बिला नुसार रॉयल्टी आकारण्यात यावी हरित लवाद यांच्या आदेशानुसार झालेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल तक्रारदाराला देण्यात यावा पाठारवाडी येथील क्रॅशर गौण खनिज खोदकामाची सार्वजनिक बांधकाम मार्फत मोजमाप करून रॉयल्टी अकरावी या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. 
       याबाबत तहसीलदार ज्योती देवरे, भानुदास साळवे यांना संध्याकाळी पत्राद्वारे सूचित केले की नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपणाला उपोषणाचा मार्ग अवलंबता येणार नाही.  हरित लवादाच्या आदेशाला तहसिलदारांकडून केराची टोपली ' असा संदेश आपण Whatsapp वर प्रसारीतकरून चुकीचे वृत्त पसरवित आहात.वास्तविक तहसिलदारांच्या आदेशाने दोन्ही खडी क्रशर सील केलेच्या आदेशावरच आपण  हरित लवादाकडे अर्ज केलेला आहे. दोन्हीही खडी क्रशर सिल असल्याबाबत. तलाठी व मंडळाधिकारी यांनी अहवाल दिलेला आहे. त्यामुळे आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये सदर क्रशर हे गावापासून दूर निर्जन वस्तीचे ठिकाणी फॉरेस्ट विभागास लागून आहे. तेथे रात्रीच्या वेळी पोलीसांनी गस्त देऊन असा काही गैरप्रकार होत असेल तर तहसिलदार यांना अहवाल सादर करावा. अशा सुचना पोलीस प्रशासनास या स्तरावरून देणेत येत आहे. आपण तात्काळ उपोषण मागे घ्यावे. असे पत्रकात नमूद केले 
 त्यानंतर भानुदास साळवे यांनी आपले उपोषण तुर्तास थांबवले आहे असे जाहीर केले.