Breaking News

नेवासा फाटा येथे माजी प्राचार्य आगळे यांच्या घरावर दरोडा ! चोरट्याच्या झटापटीत सौ आगळे किरकोळ जखमी !

नेवासा फाटा येथे माजी प्राचार्य आगळे यांच्या  घरावर दरोडा ! चोरट्याच्या झटापटीत सौ आगळे किरकोळ जखमी !  

नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर असलेल्या ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघूनाथ आगळे यांच्या बंगल्यावर शुक्रवारी राञी चोरट्यांनी दरोडा टाकून सात तोळ्याचे गंठणावर डल्ला मारला.सौ कौशल्या आगळे यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.माञ आरडा - ओरड झाल्यामुळे चोरटे अवघ्या ६ मिनीटातच  सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारुन पसार झाले. ही घटना शुक्रवार (दि.२१) रोजी मध्यराञी दोन वाजेच्या सुमारास घडली.
       नेवासा - नेवासा फाटा मुख्य रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा पडला आहे.
   ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राज्यमार्गालगत माजी प्राचार्य श्री.रघुनाथ आगळे यांचा बंगला आहे.शुक्रवारी मध्यरात्री दोनचे सुमारास हा दरोडा पडला.दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता. नेमका किती ऐवज चोरीला गेला याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह पोलीस  पथके घटना स्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथक व ठसे तज्ञ ही घटनास्थळी दाखल झालेले आहेत.