Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात १३ कोरोना बाधित, कोरोनाने लागोपाठ दोन दिवसात पारनेर शहरात दोघांचा मृत्यू !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात १३ कोरोना बाधित !
--------------------
कोरोनाने लागोपाठ दोन दिवसात पारनेर शहरात दोघांचा मृत्यू !
--------------------
तालुक्यातील कोरोनाने आजपर्यंत तालुक्यातील १५ व्यक्तींचा झाला मृत्यू !
------------------   
वाढती संख्या तालुक्यासाठी चिंतेची बाब मृत्यूचे प्रमाण या महिन्यात जास्त


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे पारनेर शहरात लागोपाठ दोन दिवसांमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे ही चिंतेची बाब आहे तर कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०० पार गेला आहे आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार १२ व्यक्ती ना कोरोना ची लागण झाली आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
यामध्ये पारनेर १ रांजणगाव मशिद १ सुपा १ देवीभोयरे १ गुणवरे १ पळशी  २ भाळवणी १ कर्जुले हर्या १ वाळवणे १ हंगे १ जवळा १ यांचा पॉझिटिव्ह अहवालाचा समावेश आहे.
      कोरोना मुळे लागोपाठ दोन दिवसात पारनेर शहरातील दोन मृत्यू
पारनेर शहरातील वीटभट्टी मालकाचे कोरोनामुळे निधन झाले आहे लग्न समारंभामध्ये उपस्थित राहिल्यानंतर त्यांना त्रास होत होता त्यानंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला २० दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे दि.२१ रोजी निधन झाले त्यांची कुटुंबातील पत्नी, मुलगा व सुन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र या तिघांनीही कोरोनावर मात केली.
तसेच पारनेर शहरातील कोरोना बाधित असलेल्या ३२ वर्षीय मटन विक्रेता हा पारनेर येथे कोरोना उपचार येत होता मात्र त्याची परिस्थिती बिघडल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तिथे उपचारादरम्यान त्याचा दि. २० रोजी रात्री मृत्यू झाला
शहरातील कोरोना बाधित मटण विक्रेता गेल्या १२ दिवसापूर्वी कोरोना चाचणी अहवालामध्ये पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये कुटुंबातील पाच व्यक्ती बाधित सापडल्या आहेत त्यांच्यावर कोरोना उपचार केले गेले व त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील कोरोना मुळे १५ व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत यामध्ये निम्म्याहून अधिक मृत्यू हे ऑगस्टमध्येच झाले आहेत  तर जिल्ह्यातील करोना मृत्यूची संख्या २०० वर केली आहे ही चिंतेची बाब आहे.