Breaking News

कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार यांचा सन्मान !

कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार यांचा सन्मान
करंजी प्रतिनिधी-
 नुकतीच अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांनी कोपरगांवचे सतत लोकांच्या प्रश्नासाठी मनापासून अहोरात्र झटणारे तहसीलदार योगेशजी चंद्रे यांचा जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला असल्याने हा कोपरगाव तालुक्यासाठी सन्मानाची बाब असल्याने कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने दि.७/८/२०२० रोजी कोपरगांव तहसिल कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांचा गौरवपूर्ण सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
    कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अशोक खांबेकर, नितीन शिंदे, तुषार पोटे, शब्बीरभाई शेख, विजय जाधव, राहुल गवळी, चंद्रहार जगताप, मनोज बिडवे, दादा आवारे, निबांळकर आदी तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य उपस्थित होते.