Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज ८ कोरोना रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात आज ८  कोरोना रुग्णाची भर
करंजी प्रतिनिधी- 
    आज दि १० ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेन्टर मध्ये एकूण आज ३२ संशयितांची कोरोना चाचणी केली असता त्यात ८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले तर  ६ जणांचे स्राव पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठवले आसून आज कोरोना वर पूर्ण पणे उपचार घेऊन बरे झालेल्या २१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
  यात कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव ३, पोहेगाव १ झगडे फाटा १ तर कोपरगाव शहरातील  इंदिरापथ,गांधीनगर व ब्रिजलाल नगर भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळुन आला आहे.
  आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या ३४२ झाली असून आज एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५६ आहे.