Breaking News

विषप्रयोग केल्याने सुशांतचे शवविच्छेदन उशिरा, सुब्रमण्यम स्वामींचा गंभीर आरोप

 मुंबई : एकीकडे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाला वेग आलेला असतानाच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतवर विषप्रयोग झाल्याने त्याची ऑटोप्सी (शवविच्छेदन) जाणीवपूर्वक उशिरा केली, असा दावा स्वामींनी केला.  

'आता मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्याच्या पलिकडे विरघळतील. जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे' असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.