Breaking News

राहाता तालुक्यात ई-पासचा काळा बाजार?राहाता तालुक्यात ई-पासचा काळा बाजार?

- ई-पास काढून देणारे रॅकेटच सक्रीय
- बहुतांशवेळा बोगस मेडिकल सर्टिफिकेटही जोडले जाते
- जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज
राज सोमवंशी/ शिर्डी
कोरोना प्रादुर्भावात राज्य सरकारने विविध नियम, अटी दिलेलेअसताना राहाता तालुक्यात ई- पासचा काळाबाजार सत्र जोरात चालूआहे. याकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेला बिलकुल ठाव ठिकाणा नसल्याप्रमाणेदुर्लक्ष करत आहे. अप्रत्यक्ष रित्या मोठ्याप्रमाणात ई-पास चा काळा बाजाराचेचित्र लोकमंथन समूहाकडून उघडकीस येत आहे.
तालुक्यात ई-पास काढण्यासाठी गरज वंताची कमी वेळेत ई पास सु-नियोजीत काढण्यार्‍याचा शोध घेतला जात आहे. ई पास काढण्यासाठी येणार्‍या कागदपत्राच्या अडचणी केवळ पैश्याच्या जोरावर खोटी माहिती सादर केली जात आहे. ई पास काढण्यार्‍याकडे वैद्यकीय सर्टिफिकेटस नसताना बनावट वैद्यकीय  सर्टिफिकेटस ई पासच्या पोर्टलवर अपलोड करुन कार्यालयीन एजन्टव्दारेकेवळ दोन तासात ई पास मिळून देण्याची हमी दिली जात आहे. ई पास पूर्ण प्रकिया व लेखी स्वरुपात प्राप्त झाल्यानंतर पैसे देण्याची ग्वाही एजंन्टव्दारे दिली जाते. पास कमी वेळेत तांत्रिक गोष्टीचेज्ञान नसणार्‍यांना केवळ पैश्यांच्या जोरावर आता हे काम अगदी सुरळीत होत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. ई पास काढण्यासाठी प्रती व्यक्ती दीडशे - दोनश,े तिनशेरुपयाचा बाजारा भावही पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला आहे. यासाठी दुकान मांडून बसण्याची बिल्कुल गरज राहिली नाही. प्रशासकिय यंत्रणेला याची बिल्कुल भणक नसल्याचेलक्षात येते. तांत्रिक ज्ञान असणार्‍या गरजवंताना या समस्येला वेगळ्याप्रकारेतोंड द्यावेलागते. टोकन आयडी प्राप्त झाल्यानंतर पाससाठी अक्षरश: डोळे फोडुन वाट बघायला लागत आहे. त्यानंतरही त्यांच्या हाताशी निराशा प्राप्त होते. यांनतर आपोआप या काळाबाजार कडे पाय वळतात. ई पासकाढून देणार्‍याचेकार्यालयाशी थेट संपर्क असल्याचेवाच्यता केली जात नाही. ई पाससाठी लागणारी अवैध रक्कम थेट कार्यालयात असणार्‍याची असल्याचेवर्तवलेजाते.
--
या कामासाठी लागते ई-पास
वैद्यकीय , लग्न समारंभासाठी, दु:खाच्या विधीसाठी, विविध ठिकाणी अडकलेल्यांना घरी परतण्यासाठी राज्य सरकारची ई-पास लागते. तर वैद्यकीय कागदपत्राची पूर्तता करुनही ई पास नाकारल्यानेपैसे देऊन पास काढण्याची वेळ येते. स्थानिक प्रशासनाने या गोष्टीची गांर्भियानेलक्ष देऊन ई - पाससाठी पध्दत सोपी करुन देण्याची गरज आहे. नियमाचे उल्लघंन, खोटी माहिती दिल्यास परवानगीधारकास कायदेशीर कारवाईचा नियम केल्यास या सर्व प्रकारच्या ई पासच्या काळाबाजारला एक प्रकारचा चपराक बसण्यास सुरुवात होईल.
----------------------