Breaking News

मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांचा सन्मान !

मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांचा सन्मान
करंजी प्रतिनिधी-
     नुकतीच कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांचा सन्मान करण्यात आला.
   अहमदनगर  चे जिल्हाअधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतीच कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांची महसूल दिनी उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव केला ही एक कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.कोपरगाव चे तहसीलदार यांनी २०१९ लोकसभा व विधानसभा मतदान योग्य रित्या हाताळले, कोपरगाव शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या पाणी प्रश्नाचा पाच नंबर तलावाचा मुद्दा अतिशय योग्य पणे सोडवला, मागील वर्षी गोदावरी नदीला आलेल्या पुरात सुमारे २० ते २५ गावे कोपरगाव शहरासह पाण्याखाली गेले होते त्या गावात वेळीच आपल्या आपत्कालीन व्यवस्थापन सह मदत कार्य पोहचून होणारी मोठी हानी वाचवली, ग्रामिण भागातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे, तसेच आता सुरू असलेल्या कोरोना च्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण तालुक्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे अशा एक ना अनेक महत्वपूर्ण कामे सामान्य जनतेसाठी रात्रंदिवस करत असलेले  कोपरगाव तालुक्यातील शेतकरी पुत्र यांचा जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला हि आमच्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे असे गौरवोउदगार कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ अरुण  गव्हाणे यांनी केला.
      यावेळी मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे,रोहित टेके टेके,सोमनाथ सोनपसारे लक्ष्मण वावरे,संतोष जाधव,शिवाजी गाढे, मोबिन खान आदी सदस्य उपस्थित होते.