Breaking News

कोरोनाचा कहर, नेवासा तालुक्यात गुरुवारी २१ रुग्णांची वाढ तर २५ रुग्णांची कोरोनावर मात !

कोरोनाचा कहर, नेवासा तालुक्यात  गुरुवारी २१ रुग्णांची वाढ तर २५ रुग्णांची कोरोनावर मात !
नेवासा तालुका प्रतिनिधी
      नेवासा तालूक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा पाठशिवनीचा खेळ सुरुच असल्याचे गुरुवार (दि. २०) रोजी हाती आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आला आहे. नविन २१ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे तर २५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  नविन २१ कोरोनाबाधीत रुग्ण पुढिल प्रमाणे खडका ७,उस्थळ दुमाला १,सुरेगांव १,भानसहिवरे १,नेवासा बुद्रूक १,देवसडे १,गिडेगांव १, भालगांव १,शिंगवेतुकाई १, कुकाणा २,सोनई २,बेल्हेकरवाडी १ व नेवासा शहर १, असे एकूण २१ रुग्णांची वाढ झालेली असून त्यामध्ये १२ पुरुष व ९ महीलांचा समावेश आहे.
    तालूक्यात आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधीत रुग्ण संख्या ५३९ झालेली आसून त्यापैकी ४२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलेले आहे.तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी तालूक्याचा आरोग्य विभाग सतर्क केलेला असून लवकरच तालूका कोरोनाच्या संसर्ग रोगाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल असल्याचे डॉ सुर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना सागितले.