Breaking News

कोपरगाव येथील नगर ला पाठवलेले २ अहवाल पॉजिटीव्ह !

कोपरगाव येथील नगर ला पाठवलेले २ अहवाल पॉजिटीव्ह !
करंजी प्रतिनिधी-
     काल दि ८ ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यातील ११ संशयितांचे अहवाल कोपरगाव आरोग्य प्रशासनाने पुढील तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले होते ते अहवाल आज दि ९ ऑगस्ट रोजी सकाळी प्राप्त झाले असून त्यात २ कोरोना पॉजिटीव्ह तर ९ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   यात दत्तनगर येथील ३४ वर्षीय पुरुष व भामानगर येथील ३३ वर्षीय पुरुष यांचा समावेश असून उर्वरित ९ अहवाल निगेटीव्ह आले आहे.
  कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या हळू हळू घटत असल्याने ही तालुक्यासाठी आनंदाची बाब असली तरी ही आज सकाळ पर्यंत कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९० झाली असून तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ३३० झाली आहे.