Breaking News

चांदे कसारेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

चांदे कसारेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव तालुक्यातील  चांदेकसारे परिसरातील इयत्ता  १० वी च्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या  विद्यार्थ्यांचा मा. आमदार  स्नेहलता  कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
     साई आधार चे मार्गदर्शक केशवराव होन यांनी आयोजित केलेल्या  या समारंभास  चांदेेकसारेच्या सरपंच सौ पुनम खरात, उपसरपंच  विजय होन, विठ्ठल होन , दिलीपराव होन,नारायण  होन,अर्जुन होन, ग्रामपंचायत सदस्य व  कर्मचारी सोशल डिस्टसिंग पाळत उपस्थित होते.