Breaking News

मुळा धरण ५० % भरणार, पाण्याची आवकही वाढली !


 मुळा धरण ५० %  भरणार, पाण्याची आवकही वाढली !
राहुरी (शहर प्रतिनिधी ) 
नगर जिल्ह्यातील सर्वांधिक क्षमता असणाऱ्या मुळा धरणाकडे आज सकाळी पुन्हा आवक वाढली असून मुळा धरण साठा आज दुपारी ५० टक्के भरणार आहे सकाळी मुळा धरणाचा साठा १२ हजार ८०० दशलक्ष घनफूटवर पोहोचला. काल सायंकाळी गुरुवारी पाण्याची आवक ४ हजार  २२० पर्यंत कमी झाली होती. आज सकाळी ती पुन्हा वाढवून साडे तीन मीटरला  तब्बल १० हजार २४२ सुरू होती. हरिश्चंद्रगड भागात जोरदार पाऊस  सुरू आहे. अहमदनगर महापालिका, दोन नगरपालिका,  नगर, सुपा एमआयडीसी व अन्य भागाला धरणाच्या पाण्याचा लाभ होतो तर राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील पाऊन लाख हेक्टर शेती धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आज दुपारी मुळा धरण भरल्यानंतर धरणाच्या पाणी साठ्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.