Breaking News

मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदेकसारे येथे पीपीई किट चे वाटप !

मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदेकसारे येथे पीपीई किट चे वाटप !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगावात तालुक्याचे  माजी आमदार अशोकराव काळे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल व आमदार आशुतोष  काळे मित्र मंडळ चांदेकसारे यांच्या वतीने चांदेकसारे आरोग्य उपकेंद्र व साई स्वामी हॉस्पीटल,सोनाई हॉस्पीटल चांदेकसारे येथे पीपीई किट चे वाटप करण्यात आले.
    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चांदेकसारे उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये कोरोना रूग्ण आढळून आले आहे. आरोग्य उपकेंद्राच्या सर्व कर्मचारी व चांदेकसारे येथील खाजगी डॉक्टर देखील रूग्ण सेवा करत आहेत, रूग्णांची सेवा करत असताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासतांना जिजाई बहूउद्देशिय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष भास्करराव होन, सचिव सुनिल होन यांनी माजी आमदार अशोक  काळे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पीपीई कीट चे वाटप केले.  
या प्रसंगी भैय्यासाहेब शेख,रासप चे अल्पसंख्याक सेलच्या चे प्रदेशाध्यक्ष सय्यदबाबा शेख,आर आर होन, नुरमोहम्मद शेख, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष भास्करराव होन, डाउच ग्रा पं सदस्य शंकरराव गुरसळ, बाबासाहेब होन,पंकज होन, शरदर होन, संतोष होन, जोगेश्वरी स्कूल चे सचिव सुनिल होन, बाळासाहेब रोकडे,सत्यवान होन, सागर होन,शुभम पवार आदी उपस्थित होते.
यावेळी चांदेकसारे आरोग्य उपकेंद्राच्या डॉ.सौ.अरूणा गाताडे,डॉ.सौ.भुंताबरे,डॉ.मोरे तसेच आरोग्य सेविका सौ.सोनी खरात,सौ.नलिनी जगताप,सौ. सिमा पवार.सौ.लता होन, सौ.रोहीनी जगताप व सर्व कर्मचारी उपस्थित होते