Breaking News

शेतकऱ्याच्या मुगाचा हाता तोंडाला आलेला घास संततधार पावसाने हिरावला !

शेतकऱ्याच्या मुगाचा हाता तोंडाला आलेला घास संततधार पावसाने हिरावला !
---------------
मुगाला शेतात आले कोंब शासनाने मदत करावी शेतकऱ्यांची मागणी !
---------------
कोरोना व आता संततधार पाऊस तालुक्यातील शेतकरी आला मेटाकुटीस !
शशिकांत भालेकर/पारनेर :- 
      राज्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे पारनेर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे अतोनात हाल होताना दिसत आहे आधीच कोरोना ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता आर्थिक दोन पैसे मिळवून देणारे मुगाचे पीकही पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातून गेले आहे मुगाच्या शेंगा सध्या तोडण्यास आल्या आहेत मात्र पडत असलेल्या पावसामुळे त्यांना मोड येण्यास सुरुवात झाली आहे.
         यावर्षी शेतकऱ्याला प्रचंड संकटांना सामना करावा लागत आहे यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला आहे शेत मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने बाजार भावाबाबत अनिश्चितता निर्माण होत आहे अशातच वटाण्याच्या पिकातून दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती मात्र हजारो रुपयाचे बियाणे खरेदी करून त्याची वसुली शेतकऱ्याची झाली नाही तसेच मुगाचे पीक हे आर्थिक मजबुती पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देत असते यावर्षी तुलनेत मुगाचे उत्पादन जास्त घेण्यात आले व पोषक वातावरण असल्याने वेळोवेळी पडलेल्या पावसामुळे हे पीक जोमात आले होते मुगाला शेंगाही चांगल्या लागल्या मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये उन पडणे अपेक्षित असताना त्याच काळामध्ये संततधार पावसाला सुरुवात झाली आणि शेंगा जसजशा वळायला लागल्या तसतसा पाऊस उघडायचं नावच घेईना यामुळे  शेंगांना मोड येण्यास सुरुवात झाली शेतकरी या गोष्टी उघड्या डोळ्याने पाहवले नाही अक्षरशः पावसामध्ये काही शेतकऱ्यांनी मुगाच्या तोडण्यास सुरुवात केली वरून पडणाऱ्या पावसात शेतकरी खाली मुगाच्या शेंगा तोडताना तालुक्यात दिसत आहेत मात्र ते करूनही शेंगा वाळवण्या साठी ऊन पडत नसल्याने त्या शेंगा घरामध्ये ठेऊन त्यांना मोड येत आहे मात्र तरीही शेतकरी दहा वीस टक्के काहीतरी हाताला लागतील या आशेने भर पावसामध्ये तो तोडत आहे अशी परिस्थिती शेतकऱ्याची सध्या झाली आहे मात्र एवढी मेहनत करूनही त्याच्या हातात काही लागत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
 संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला मुगाच्या पिकाचा घास हिरावून घेतला असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे यापूर्वीच कांद्याचे बाजार भाव कोसळले आहेत वटाणा पिकातून भांडवल निघाले नाही भाजीपाल्याला भाव मिळत नाही हवामान खराब असल्याने रोगराईचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा अनेक संकटात शेतकरी सापडला आहे मात्र सरकारने याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे कोरोना संकटात शेतकरी सर्वात जास्त भरकटला गेला आहे मात्र त्याचा कुठेही उल्लेख होताना दिसत नाही गप गुमान शेतकरी हे आर्थिक नुस्कान सहन करत आहे मात्र आता पावसामुळे मुगाचे पीक हातचे गेले आहे त्याचा त्वरित पंचनामा होऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे तरच सर्व शेतकरी या आर्थिक हतबलतेतून सावरू शकतील अन्यथा कोरोना व निसर्गाची अनियमितता यामुळे शेतकरी मोडकळीस येईल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून शासन दरबारी झालेल्या नुकसानीची माहिती कळवावी व या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
 
      यावर्षी कोरोना संकटामुळे अचानक लागू झालेल्या लॉक डाऊन मध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतीमालाची नासाडी व नुस्कान झाले शेतकऱ्याला शेतमाल बाजारपेठा बंद असल्याने शेतातच ठेवावा लागला व मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले मात्र त्यातूनही सावरत पुन्हा या हंगामात नव्या जोमाने शेतकऱ्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील निसर्गाने हाणून पाडला आहे त्यामुळे बळीराजा आता पूर्णपणे मोडकळीस आला आहे त्याला सरकारने सावरणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------------
     या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे यातून बाहेर पडण्यासाठी शासन दरबारातून मदतीची अपेक्षा आहे प्रथम कोरोना काळामध्ये शेतमालाचे नुसकान व आता आलेले मुगाचे पावसामुळे झालेले नुसकान मुगाला अक्षरक्ष शेतातच कोंब आले आहे तोडण्यास मजूरही मिळत नाहीत तसेच ढगाळ हवामान संततधार पाऊस यामुळे हे पीक आता हातचे गेले आहे मुग तोडण्यासाठी मजूर मिळत नाही मिळाले तर त्यांना मागेल ती मजुरी द्यावी लागते पावसामुळे हार्वेस्टर शेतात जात नाही शेतकऱ्याने नेमकं करायचं काय ?
-----------
संपत दत्तात्रय वारे
(शेतकरी)