Breaking News

कुंभारी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवकांचा सत्कार !

कुंभारी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवकांचा सत्कार !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यांतील कुंभारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कुंभारी येथुन राहुरी तालुक्यात बदली झालेले ग्रामसेवक संजय डौले  व त्या जागी नियुक्ती झालेले नुतन ग्रामसेवक कासवे  यांचा ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सरपंच प्रशांत घुले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. 
या वेळी बोलताना संजय डौले  म्हणाले कि गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले असुन गोरगरीब जनतेच्या अडचणी युध्दपातळीवर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला  या कामी सरपंच तसेच सर्व कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.
सरपंच प्रशांत घुले बोलताना म्हणाले कि कोरोना महामारीचा काळात डौल यांनी दक्षता समितीचा सर्व सदस्यांना बरोबर घेउन गावातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेताना जंतुनाशक औषधांची फवारणी.कोरोना विषयीची जनजागृती, लॉककडाउनच्या काळात संशयीतांचे विलगीकरन या सारख्या उपाययोजना केल्याचे   त्यांनी शेवटी सांगीतले.
याप्रसंगी सरपंच प्रशांत घुले, उपसरपंच दिगंबर बढे,वसंत घुले, ललित निळकंठ,दिलीप कातोरे, किशोर पवार,आशिष थोरात.  सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सह बाबासाहेब बढे,दिलीप ठाणगे, रमण गायकवाड,तसेच सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते