Breaking News

आठ दिवसात कोपरगाव महसुलचे दोन तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

आठ दिवसात कोपरगाव महसुलचे दोन तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात 
 ( येसगावातील कारवाई बाबत उलटसुलट चर्चा )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
   एकीकडे  कोपरगाव चे तहसिलदार योगेश चंद्रे यांना आदर्श तहसिलदार म्हणून जिल्हाधिका-यांनी गौरवून तालुक्याच्या महसुल विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तर त्याच महसुल विभागाचे आठ दिवसात दोन तलाठ्यांना लाच स्विकारताना नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाच्या टिम ने रंगेहाथ पकडुन कारवाई केल्याने महसुल विभागात होत असलेला  भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे.
  आठ दिवसापूर्वी म्हणजेच २९ जूलै रोजी कुंभारी येथील तलाठी सुनिल साबने याला एका वाळु तस्कराकडून कारवाई न करण्यासाठी ५००० रुपयाची लाच स्विकारताना त्याच्या कार्यालयात पकडले त्याला पकडून आठ दिवस होत नाही तोच ५ आॕगस्ट रोजी येसगाव येथील महीला तलाठायास नाटेगाव ता.कोपरगाव  येथील शेतकऱ्याच्या नोंद लावण्यासाठी ८०० रुपये घेताना नाशिक ला.प्र.विभागाच्या टिम ने पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे,अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर,संदिप साळुंखे,वैभव देशमुख,प्रविण महाजण यांच्या  टिमने तलाठी कार्यालयातच पकडुन  महसुल विभागातील न संपलेला भ्रष्टाचार दाखविला यावरुन महसुल विभागावर ना तहसिलदारांचा वचक ना लोकप्रतिनिधीचा हेच अधोरेखित होत असुन दैनंदिन  कामकाज करताना नागरिकांना नविन रेशन कार्ड ,विविध प्रकारच्या नकला दाखले ,उत्पन्नाचे दाखले या व इतर कामासाठी तलाठी,तहसिल कचेरीत जावे लागते पर्ंतु एक कागद मिळवण्यासाठी कीती चकरा माराव्या लागतात  हे न सांगितलेले बरे त्यातच सध्या कोरोणा चे वाढलेले रुग्ण त्यामुळे बरेच नागरिक आपले महत्त्वाचे काम सोडुन देतात .एवढे असले तरी तालुक्यातील तहसिलदारांची असलेली कामगिरी निश्चितच चांगली आहे महसुलच्या काही तलाठ्यांचे कामही आदर्शव्रत आहे माञ एकामुळे प्रतिमा मलीन होते. चांगले काम करुनही एखांदा तलाठी नाहक बळीचा बकरा होत असेल तर त्याच्या मागे महसुल विभागानेही खंबीर पणे उभे राहीले पाहिजे जेणे करुन इतर  चांगले काम  करणाऱ्या तलाठ्यांना काम करताना अडचण येणार नाही तालुक्यात महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे झालेल्या कारवाई चा इतर कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे तर येसगाव येथील तलाठी वर झालेल्या कारवाईची सदर महसुल सजातील नागरिकांमध्ये  उलटसुलट चर्चा आहे