Breaking News

संजीवनीला ‘बेस्ट एनर्जी इफिसिएंट’ संस्था पुरस्कार - श्री अमित कोल्हे

संजीवनीला  ‘बेस्ट एनर्जी इफिसिएंट’ संस्था पुरस्कार   - श्री अमित कोल्हे
   ( भारतातुन संजीवनी ही एकमेव शैक्षणिक  संस्था ठरली पुरस्काराची मानकरी )
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
     उद्योग क्षेत्राशी  निगडीत असलेल्या व  १८९५ पासुन कार्यरत असलेल्या काॅन्फेडेरेशन  ऑफ  इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने ‘नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२०’ या स्पर्धे अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला  उर्जा क्षेत्रात नियोजन बध्द व कार्यक्षम वापराबध्दल ‘बेस्ट एनर्जी इफिसिएंट  ऑर्गनायझेशन ’ हा पुरस्कार देवुन देश  पातळीवरील प्रथम रनर अप या रॅन्क ने गौरविले. ही स्पर्धा विशेष  करून उर्जा क्षेत्रात कार्यक्षमरित्या कामगिरी करत असलेल्या उद्योगांसाठी असते. तरी देखिल संजीवनी ही शैक्षणिक  संस्था असुन देखिल उर्जा क्षेत्रात आपली भरीव कामगिरी सिध्द केली आणि भारतातील नामांकित कंपन्यामधुनही मुसंडी मारून पुरस्कार प्राप्त केला, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
       पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की ‘नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२०’ अंतर्गत देशातील  स्माॅल स्केल एन्टरप्रायझेस च्या वर्गवारीतुन संजीवनीसह २५ कंपन्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उर्जा क्षेत्राशी  निगडीत अपारंपारीक उर्जा, पारंपारीक उर्जेतुन होणारे प्रदुषन थांबविण्यासाठीच्या उपाय योजना, इतर प्रकारच्या उर्जांचे संवर्धन आणि वापर अशा  अनेक बाबींवर पुराव्यासह सादरीकरण करायचे होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मधिल डीन, आर अँड  डी चे प्रमुख डाॅ. आर. ए. कापगते यांनी सिसको वेबेक्स द्वारे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये  उर्जेशी  निगडीत प्रत्यक्षात वापरत असलेल्या विविध उपक्रमांविषयी सादरीकरण केले.
सादरीकरणात संजीवनीच्या वतीने संजीवनीमध्ये उभारलेल्या ५०० किलोवॅटचा सोलर वीज प्रकल्प, त्यामुळे वर्षभरात  टळणारे विषारी  वायुंचे उत्सर्जन, अनेक कारणांवरून हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यावर प्रतिकार म्हणुन हवेत ऑक्सिजन सोडण्यासाठी कॅम्पसमध्ये झाडी लावुन त्यांचे संवर्धन व दरवर्षी  नवीन वृक्षांची लागवड, सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठीचा प्लॅन्ट व त्या पाण्याचा वृक्षांसाठी पुनरवापर, मेस व कॅन्टीन मधिल वेस्ट फुडचा व झाडपाल्यांपासुनचे खत व त्याचे वृक्षांसाठी वापर, सभोवलताच्या परींसरांमधुन विद्यार्थ्यांनी  वैयक्तिक वाहनांवर येण्याऐवजी त्यांना बसेसची सोय करणे व त्यामुळे वाचलेले विषारी  वायु उत्सर्जन, कॅम्पस व सभोवतालच्या कामांसाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करणे, इत्यादी बाबींची माहिती देण्यात आली. रस्त्यांवर डीझेल व पेट्रोलवर धावणारी वाहने व कारखान्यांच्या धुराड्याातुन होणारेे विषारी  वायु उत्सर्जन, हे सर्व उर्जा निर्मितीमुळेच होते.                    त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत आहे. मात्र या विषारी  वायु उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी ऑक्सिजन हवेत सोडला गेला पाहीजे. म्हणुन संस्थेने केवळ कॅम्पस मध्येच झाडी लावली नाही तर संस्थेचे विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांचे पुढाकाराने वेगवेगळया  रस्त्यांच्या कडेला देखिल झाडी लावुन त्यांचे संगोपन केले आहे. या सर्व बाबींची दखल घेवुन सीआयआय ने घेतलेल्या ‘नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२०’ या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला प्रथम रनर अप चा पुरस्कार दिला. डाॅ. कापगते यांनी दिलेल्या ऑनलाईन  सादरीकरणाची काही फार्मास्यिुटीकल कंपन्यांनी दखल घेवुन वाटर ट्रिटमेंट प्लान्ट व खत निर्मीती प्रकल्पाची माहिती घेतली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय  पातळीवरील यशा बध्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे व कार्याध्यक्ष श्री नितिनराव कोल्हे यांनी  समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.