Breaking News

ऊस पिकावरील पांढरी माशी किडीचे त्वरित नियंत्रण करून नुकसान टाळावे : बिपिनदादा कोल्हे.

ऊस पिकावरील पांढरी माशी किडीचे त्वरित नियंत्रण करून नुकसान टाळावे :  बिपिनदादा  कोल्हे.


 कोपरगाव /तालुका प्रतिनिधी :
          कोपरगाव तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे ऊस पिकावर पांढरी माशी या रसशोषक किडीचा व कोएम  ०२६५ या ऊस जाती च्या पानावर तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून त्यामुळे ८० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते, त्यासाठी त्यांचे वेळीच नियंत्रण करून नुकसान टाळावे असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.
           ते पुढे म्हणाले की, परिसरात सततचा पाऊस पडत असल्याने त्याचे पाणी जमिनीत साचून राहून, तसेच हवेतील आर्द्रता या पोषक हवामानामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पांढऱ्या माशी साठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेने शिफारस केलेल्या बीव्हिएम हे दोन लिटर जैविक कीटकनाशक चारशे लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे व ज्या ठिकाणी पांढरी माशी व तपकिरी ठिपके या दोन्हींचा प्रादुर्भाव आहे, तेथे डायथेन एम-४५ व १०० मिली कॉन्फिडोर 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करून शेतकऱ्यांनी सदरचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, ही दोन्ही औषधे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळ व विभागीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे बिपिनदादा कोल्हे शेवटी म्हणाले