Breaking News

कोपरगाव शहर व लगतच्या ग्रामीण भागात बेवारस डुकराचे प्रमाण वाढले !

कोपरगाव शहर व लगतच्या ग्रामीण भागात बेवारस डुकराचे प्रमाण वाढले
( कुत्र्यांच्या हल्ल्याने जखमी डुकरांचा सुळसुळाट )


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी : 
      कोपरगाव शहरात व शहरी भागातील ग्रामपंचायत असलेल्या जेउर पाटोदा परीसरात नवीन असलेल्या शुभमनगर आनंद नगर व ग्रामपंचायत समोरील अनेक उपनगरांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नसल्याने मोठ्या प्रमाणावर डुकरांचे साम्राज्य वाढलेले असुन भटक्या कुत्र्यांना लाॅक. डाउन व संचारबंदी यामुळे अडचणी मध्ये आलेल्या लोकांकडून खाद्य पदार्थ मिळत नसल्याने अनेक कुत्रे हे वाढलेल्या डुकरावर व पिल्लांवर हल्ला करत असल्याने जखमी डुकराचे साम्राज्य वाढलेले असल्याने नागरिक व जेउरपाटोदा गावातील ग्रामस्थांन मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
       हे जखमी डुकरे बेवारस स्थितीत मृत्यू मुखी देखील पडतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरुण साथीचे आजार तर पसरणार नाही ना या चिंतेने अनेकांना ग्रासले असुन या डुकराच्या मालकावर कधी कारवाई होत नसल्याने हे संख्येचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असुन स्थानिक ग्रामपंचायत व नगरपालिका यावर कठोर कारवाई का करत नाही. असा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणात कठोर कारवाई झाली नाही. तर वेळ प्रसंगी जिल्हा अधिकारी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सांगितले या बाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना लेखी पत्र देखील दिले आहे. मात्र कारवाई कडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजीची भावना असुन या प्रकारात माजी आमदार स्नेहलता कोल्हे आ आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे अशी मागणी पुढे आली आहे.