Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात ३३ व्यक्ती कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात आलेल्या अहवालात ३३ व्यक्ती कोरोना बाधित !
------
पारनेर पंचायत समितीचा शिपाई कोरोना बाधित !
------
पारनेर तहसिल कार्यालयातील सर्व अहवाल निगेटिव्ह
पारनेर प्रतिनिधी- 
    पारनेर तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
   यात सुपा ५, वाडेगव्हाण ४, किंन्ही ७, निघोज २ रुई छत्रपती २ दैठणे गुंजाळ १ पारनेर शहर ३ रांजणगाव मशीद २, हंगे १, डिसकळ २, नारायण गव्हाण २, वडझिरे १, पारनेर महाराष्ट्र बँक(नगर रहिवासी) १ या गावात कोरोना बाधित आहेत तालुक्यात  संध्याकाळपर्यत एकूण ३३ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत.
तर पारनेर तालुक्यातील शासकीय लॅब चे २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये पारनेर १८ रांजणगाव मशीद १ करंदी १ असे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
     पारनेर तालुक्यात कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.
    ज्या भागामध्ये कोरोना बाधित व्यक्ती अहवालात पॉझिटिव आहे. तो १०० मीटर परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.