Breaking News

कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कोरोना निधीसाठी भरीव मदत.

कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कोरोना निधीसाठी भरीव मदत. 
करंजी/प्रतिनिधी :
      आज ४ ऑगस्ट आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस संपूर्ण कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत आसल्याने आ. काळे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते व कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आव्हान केले होते. आ.आशुतोष काळे वर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील कार्यकर्त्यानी सोशल डिस्टनसिंग चे पालन करत  वेगवेगळ्या पद्धतीने गावोगाव सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला.  वृक्षारोपण आणि काही ठिकाणी मास्क सॅनिटाइझरचे वाटप केले.
    यात कोपरगाव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या सदस्यांकडून भरीव निधी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये (१२५०००) गोळा करून ते सर्व पैसे कोपरगाव तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर कोरोना निधी म्हणून कोपरगाव  तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या आमदार निधी मध्ये जमा केले आहेत.
   त्यातून आ आशुतोष काळें यांनी सुमारे ३६ स्वयंचलित सॅनिटायझर मशीन खरेदी करून अत्यंत वर्दळीचे व महत्त्वाचे ठिकाण असलेले कोपरगाव मधील पंचायत समिती व कोपरगाव तहसिल कार्यालयातील विविध विभागातील प्रवेशद्वाराजवळ बसविन्यात येणार आसून या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अधिकारी व सामान्य नागरिकांना या सॅनिटायझर मशीन चा उपयोग होईल. हे मशीन प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडे समघटनेच्या वतीने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षक बँकेच्या संचालिका विद्युलता आढाव शिक्षक समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक आढाव  यांच्या हस्ते देण्यात आले.
  या सामाजिक उपक्रमास प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षक बँकेच्या संचालिका विद्युलता आढाव ,शिक्षक समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे, विकास मंडळाचे विश्वस्त रमेश दरेकर, गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, शशिकांत जेजुरकर, श्रीराम तांबे, प्रमोद जगताप, सिताराम गव्हाणे, प्रदिप भाकरे, आप्पासाहेब चौधरी, संजय खरात, महेंद्र निकम,दत्ता गरुड, लक्ष्मीकांत वाडिले,.अनिल झाल्टे, सिध्दांत भागवत,.कैलास वाघ,.वसंत भातकुडव आदी.सदस्याचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व सदस्यांनी आ आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.