Breaking News

आदिवासी दिनानिमित्त विलासनगर पिसेवाडीच्या तरुणांनी केले श्रमदान !

आदिवासी दिनानिमित्त विलासनगर पिसेवाडीच्या तरुणांनी केले श्रमदान ! 
 अकोले/ प्रतिनिधी :
     आज जागतिक आदिवासी दिन तो कसा साजरा करावा याचा आदर्शच  विलासनगर पिसेवाडीच्या ठाकर समाजातील तरुणांनी दाखवुन दिला.  आदिवासी दिन साजरा करण्याच्या निमित्ताने गावातील सर्व तरुण एकत्र आले थोड्याच वेळात वर्गणी गोळा करून शाळेचे मैदान व शाळेकडे जाणारा रस्ता श्रमदानाने तयार करण्यासाठी शेकडो हात सरसावले . एक जे सी बी उपलब्ध करुन शाळेचे मैदान सपाट तर केलेच शिवाय शालेय परिसराची स्वच्छता ही केली व पुन्हा एकदा गाव करिल ते राव काय करील या म्हणी ची प्रचिती आली.       सर्व तरुणांनी एकत्र येत शाळेचे मैदान सपाटीकरणात दाखवलेली तत्परता हाच खरा आमचा आदिवासी दिन असल्याची भावना गावातील तरुणांनी बोलुन दाखवली. यावेळी गावातील तरुण,  ग्रामस्थ, शिक्षक आरोटे सर व फुलसुंदर सर उपस्थित होते
--