Breaking News

डॉ सतीश खर्डे यांना सरपंच सेवा संघाचा युवारत्न राजनेता पुरस्कार जाहीर !

डॉ सतीश खर्डे यांना सरपंच सेवा संघाचा युवारत्न राजनेता पुरस्कार जाहीर


करंजी प्रतिनिधी-
      सरपंच सेवा संघ महाराष्ट्र  जिल्हा अहमदनगर च्या वतीने कोणतीही राजकीय  पार्श्वभूमी नसतांना अल्पावधीतच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले डॉ सतीश चंद्रकांत खर्डे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संगमनेर राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी  परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
       संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या सरपंच सेवा संघाचे राज्यभरात तब्बल २० हजार सरपंच सभासद आहे यांच्या माध्यमातून अहमदनगर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना दरवर्षी सन्मानीत करण्यात येत असते. या वर्षी राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अल्पसंख्याक आयोग  दिल्ली चे सदस्य डॉ सतिश चंद्रकांत खर्डे यांना या वर्षीचा राजकीय क्षेत्रातील ते करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला.   
       पुढील काही दिवसांत नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते खर्डे यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पावसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     सरपंच महासंघाच्या वतीने खर्डे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.